महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे दापोली गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

दापोली : कोविड-19 अंतर्गत शिक्षकांच्या आपातकालीन सेवा घेतल्या जात आहेत, या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, ता.दापोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी श्री.संतोष भोसले यांना निवेदन देण्यात आले. कोविड-19 अंतर्गत शिक्षकांच्या कोविड सर्वेक्षण, पोलिस मिञ, स्वस्त धान्य दुकान निरिक्षक, विलगिकरण कक्षावर नेमणुक, इ. जोखमीच्या ठिकाणी शिक्षकांना नेमणुका दिल्या जात आहेत. मुंबई, पुणे व इतर जिल्ह्यातून येणा-या प्रवासी संख्येमुळे कोविड रूग्ण व संस्थात्मक विलगिकीरण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. सदर वेळी शिक्षकांवर प्रशासकीय धाक दाखवून जोखमीची आपातकालीन कामे लादली जात असल्याने, शिक्षकांत असंतोष पसरल्याचे निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले आहे. प्राथमिक शिक्षकांना आपातकालीन सेवा बजावताना आजवर मास्क, फेस शिल्ड, दस्ताने, पीपीई कीट इ. आवश्यक सुविधा तथा कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण का उपलब्ध करून दिले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यातच वर्तमान परिस्थितीत शिक्षकांचा संशयित रूग्णांशी जवळचा संबंध येत असल्याने निवेदनाच्या माध्यमातून शिक्षकांच्या आरोग्याविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. शिक्षक समितीने निवेदनाद्वारे शिक्षकाविषयी मानवतावादी दृष्टिकोन ठेवून शिक्षकांना कमीत कमी दिवस आपातकालीन सेवेवर रूजू करण्याचे आदेश देणे, विना जोखिमीच्या ठिकाणी शिक्षकांच्या सेवा घेणे, अत्यल्प तास शिक्षकांना आपातकालीन सेवा ठिकाणी नेमणुक देणे, राञपाळीत नेमणुका न देता सकाळी 8.00 ते संध्या. 8.00 पर्यंत नेमणुका देणे, महिलांना आपातकालीन सेवेंतर्गत सेवा देण्याचे आदेश न देणे इ. मागण्या केल्या आहेत. अती जोखिमीच्या ठिकाणी उदा. आयसोलेशन कक्ष, विलगीकिकरण कक्ष इ. ठिकाणी आदेश न देण्या बाबत कटाक्ष ठेवून सदर निवेदनाच्या अनुषंगाने आवश्यक कार्यालयात पाठपुरावा करण्याच्या सुचना शिक्षक समिती, दापोलीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना करण्यात आल्या आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करत सदर निवेदनाच्या प्रति मा.सभापती दापोली, तहसीलदार दापोली व गटविकास अधिकारी दापोली कार्यालयात देण्यात आल्या असून दापोली तालुक्यातील शिक्षक न्यायाच्या प्रतिक्षेत असल्याचे सदर निवेदनाच्या अनुषंगाने लक्षात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here