सौदी अरामको रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार

0

देशातील अब्जाधीश असलेल्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमटेडची (RIL) आज (ता.१२) वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. खनिज तेल उत्पादनातील मातब्बर कंपनी असलेली सौदी अरामको रिलायन्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. 

सौदी अरामकोची तेल क्षेत्रात रिलायन्सशी भागीदारी झाल्याची माहिती अंबानी यांनी दिली. सौदी अरामको रिलायन्समध्ये २० टक्के गुंतवणूक करणार  आहे. सौदी अरामको १५ बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीकडून इंजिनाचा दर्जा सुधरण्यासाठी आणि त्याची लाइफ वाढवण्यासाठी ‘ऑईल टू केमिकल’ व्यवसायाच्या माध्यमातून ऑईलपासून सर्वोत्कृष्ट प्रॉडक्ट तयार करत आहे. कंपनी या व्यवसायापासून २.२ लाख कोटी रुपयांची निर्यात करत आहे. 

Reliance Jio GigaFiber या बहुप्रतिक्षित ब्रॉडबँड सेवेची सुद्धा घोषणा करण्यात आली. गेल्या वर्षभरापासून देशात अनेक ठिकाणी जिओ गिगाफायबरची चाचणी सुरु होती. पाच लाख घरांमध्ये सध्या या सेवेचा वापर केला जात आहे. १०० जीबी पेक्षा जास्त डेटा यामध्ये वापरला जात आहे. यासोबत लँडलाईन सेवाही मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here