म्हणून स्पेसक्राफ्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण ढकलले पुढे

केप कॅनावरा : खराब हवामानामुळे अंतरळवीरांचे उड्डाण पुढे ढकलण्यात आले आहे. आता उड्डाणासाठी शनिवारी प्रयत्न केला जाणार आहे. ‘ह्युमन स्पेस’ रात्री २ वाजून ३ मिनिटांनी उड्डाण घेणार होते. ९ वर्षानंतर अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणार होते. मात्र, खराब हवामानामुळे उड्डाण करणे शक्य झाले नाही. त्यामुळे रात्रीचे उड्डान स्थगित करण्यात आले. खराब हवामानामुळे खासगी कंपनी स्पेस एक्सच्या (SpaceX) स्पेसक्राफ्ट अंतराळ यानाचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले आहे. हे यान नासाच्या दोन अंतराळवीरांना अंतराळ कक्षाकडे घेऊन जाणार होते, परंतु ढगाळ आकाश आणि वादळासह पाऊस कोसळत असल्याने या मिशनचे प्रक्षेपण होण्याच्या १७ मिनिटांपूर्वीच थांबवावे लागले. आता या मोहिमेची सुरुवात शनिवारी होईल. इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी खासगी कंपनी पहिल्यांदा मानवाला अंतराळात नेईल. स्पेस एक्स कंपनीने हे अंतराळ यान तयार केले आहे. बुधवारी दुपारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून त्याचे प्रक्षेपण होणार होते. पण खराब हवामानामुळे असे होऊ शकले नाही. हे खाजगी मालकीचे अवकाशयान अंतराळ वाहून नेण्यात यशस्वी ठरल्यास ते व्यावसायिक अवकाश उड्डाणांच्या दिशेने नव्या युगाची सुरुवात करेल. हे अभियान पुढे ढकलण्यात आल्याचे नासा प्रशासनाने ट्विट केले. नासाने ट्वीट केले की आज लॉन्चिंग होणार नाही. आमच्या क्रू मेंबरची सुरक्षा उच्च प्राथमिकता आहे. अमेरिकेने खराब हवामानामुळे आपल्या ह्युमन स्पेस मिशनला स्थगिती दिली आहे. उड्डाण घेण्याच्या १६ मिनिटे ५४ सेकंदाला हा निर्णय घेण्यात आला. रात्री २ वाजून ३ मिनिटांनी उड्डाण घेणार होते. नऊ वर्षानंतर अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर जाणार होते. नासाच्या कॅनेजी स्पेस सेंटरवर यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली होती. रॉबर्ट बेनकेन आणि डगलस हर्ले या दोन अंतराळवीरांची यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी या दोघांनी जोरदार तयारी केली होती. मात्र खराब हवामानामुळे मिशनला स्थगिती द्यावी लागली. आता तीन दिवसांनंतर पुन्हा एकदा यावर काम होणार असल्याचे नासाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here