आवडते नेते कोण?, मोदी की पवार ?; राज ठाकरे म्हणाले..

0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहावं, असा सल्ला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे.

तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीकडे लक्ष देण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला. एका पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. दोघांनीही राज ठाकरेंवर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, राज ठाकरेंनी आपल्या ‘ठाकरी’ शैलीत त्यांच्या प्रश्नांचे चेंडू सीमेपार टोलवले.

राज ठाकरेंना यावेळी तुमचे आवडते नेते कोण?, पंतप्रधान नरेंद्र मोदी कि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार?, असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला. यावर तसं फार कोण नाही. याचं कारण म्हणजे मी लहानपणापासून आदराने पाहत आलो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यापैकी कोणता नेता आवडतो, यापेक्षा मी दोघांच्या कामाची तुलना करु शकले, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

दोघांमध्ये जर बघायला गेलो तर नरेंद्र मोदी आणि शरद पवार दोघेही कामाला वाघ आहेत, असं कौतुक राज ठाकरेंनी केलं. राजकीय एखादी भूमिका मला न आवडणं, मला न पटणं हे स्वभाविक आहे. याच्यासाठी आपण त्या व्यक्तींवर फुल्ली मारत नाही. मी ज्यावेळी नरेंद्र मोदींवर देखील टीका करत होते, ती टीका नरेंद्र मोदींवर केलेली नाही, तर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर केली होती, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here