राजापूर पंचायत समितीत होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

राजापूर : आयुष मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार आ. राजन साळवी यांच्या सूचनेनुसार राजापूर पंचायत समिती कार्यालयात आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली असून कोरोनाबधितांची संख्या वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेनुसार रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप राजापूर पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले. आ. साळवी यांनी स्वखर्चाने या गोळ्या उपलब्ध करून दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here