पायलट निघाला पॉझिटिव्ह; विमान अर्ध्यावरून फिरवावं लागलं परत

नवी दिल्ली : वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाचं विमान शनिवारी सकाळी मॉस्कोला निघाले. मात्र मॉस्कोला विमान घेऊन निघालेल्या पायलटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे विमान अर्ध्या मार्गातून परत फिरवण्यात आलं. दिल्ली विमानतळावर या विमानाचं आता निर्जंतुकीकरण केलं जात आहे. शनिवारी सकाळी निघालेलं हे विमान उझबेकिस्तानपर्यंत पोहोचलं होतं. विमानाचा कॅप्टन आणि क्रू मेंबर्स यांची उड्डाणापूर्वी चाचणी झाली. पण चाचणी करणाऱ्या टीमकडून नजरचुकीने कॅप्टनचा पॉझिटिव्ह अहवाल निगेटिव्ह असल्याचं वाचलं गेलं. पण नंतर ही चूक लक्षात आली आणि विमान परत बोलवावं लागलं. एअर इंडियाचं हे विमान दिल्ली विमानतळावर १२.३० च्या सुमारास दाखल झालं. आता सर्व क्रू मेंबर्सला नियमानुसार १४ दिवस कॉरेंटाईन रहावं लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:05 PM 30-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here