नवी दिल्ली : बँक ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. सर्व साधारणपणे सरकारी सर्वजनिक बँकांच्या कामकाजाची वेळ सकाळी १० नंतर सुरू होते. केंद्रीय अर्थ मंत्रालयातील बँक विभागाने बँकांच्या कामकाजाच्या वेळे संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे देशभरातील बँकाच्या कामकाजाची वेळ बदलणार आहे. अर्थ मंत्रालयाच्या सूचनेनुसार सर्व सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सकाळी ९ वाजता सुरू होतील. देशातील सर्व बँकाचे कामकाज सुरू होण्याची वेळ एक समान असावी या हेतूने अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील बैठक जून महिन्यात झाली होती. बैठकीत बँकांच्या शाखा ग्राहकांच्या सोई नुसार सुरू झाल्या पाहिजेत असे मत मांडण्यात आले होते.
