गुहागरात ट्रक-दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी

0

गुहागर : गुहागर-चिपळूण या मुख्य मार्गावरील चिखली येथे शुकवारी सकाळी 9.45 च्या सुमारास टाटा ट्रक व दुचाकी यांच्यात अपघात होऊन यामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी हॉस्पिटलला नेण्यात आले आहे.

या घटनेची खबर ट्रकचालक समीर दत्तात्रय खेडेकर (49, माखजन- संगमेश्वर) यांनी दिली. यामध्ये ते आपल्या मालकीच्या टाटा ट्रकमध्ये अल्ट्राटेक सिंमेंट भरून ते रत्नागिरी- निवळी- गुहागर असा प्रवास करत होते. शुकवारी सकाळी 9.45च्या सुमारास गुहागर-विजापूर रोडवर चिखली येथे दुचाकीस्वार बाशीद अली अय्याज माहीमकर ( 29, गुहागर) हा चुकीच्या बाजूला येवून ट्रकसमोरील बाजूस आदळून गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 06/May/2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here