दुचाकीस्वाराला धडक दिल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील गुणदे फाट्यानजीक दुचाकीस्वाराला धडक दिल्याप्रकरणी कारचालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारचालक अंकुश महाजन (34, रा. करीरोड मुंबई) हा (एम.एच. 01/डी.आर. 0665) क्रमांकाची इर्टिका कार घेवून पनवेलहून चिपळूणच्या दिशेने येत होते. यावेळी कार विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकी (एम.एच.04/के.क्यु. 1977) ला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वारास दुखापत होवून दुचाकीचे नुकसान झाले. दुचाकीस्वाराने दिलेल्या तक्रारीनुसार कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here