राष्ट्रवादीने मविआतून बाहेर पडावं, असं राऊतांना वाटतंय का? छगन भुजबळांचा सवाल

0

मुंबई : शरद पवार यांनी (Sharad Pawar ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात जे म्हणाले होते, त्यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी करायची नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. संजय राऊत (Sanjay Raut) यांना हे सगळं उकरून काढायची काय गरज आहे? संजय राऊत यांना असं वाटतं का, की राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून बाहेर पडायला पाहिजे, मनभेद निर्माण व्हावे? असा सवाल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) धुसफूस सुरु आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काहींना काही वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे वातावरण तापलेले दिसून येत आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या ‘
लोक माझे सांगाती’ (Lok Majhe Sangati) या पुस्तकातून पहाटेचा शपथविधी आणि उद्धव ठाकरे (Udhhav Thakceray) यांच्या बाबाबत मांडणी करण्यात आली आहे. यावरून आजच्या सामनातून राष्ट्रवादी पक्षावर संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संजय राऊत लिहतात की शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणार नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार राष्ट्रीय पातळीवरचे मोठे नेते नक्कीच आहेत, तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे या अग्रलेखावरून राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यामध्ये बिनसल्याची शक्यता आहे.

दरम्यान या अग्रलेखाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी संजय राऊत यांना जाब विचारला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील यासह अनेक नेते आहेत. ते काम करण्यास समर्थ आहेत. या नेत्यांवर जी जबाबदारी टाकली जाईल, ती समर्थपणे पेलण्याची धमक या नेत्यांमध्ये असल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले कि, तुमचं जेवढं आयुष्य आहे, तेवढं शरद पवार यांचे राजकारण आहे. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील असे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते कुणाच्या घरात गेले होते, त्यांना माहित. मात्र संजय राऊत यांनी इतकं लक्ष शिंदे गटावर आणि त्यांच्या बॅगांवर ठेवले असते, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

काय म्हटलं आहे ‘सामना’त?

शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्त्व पक्षात उभे राहू शकले नाही. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयश ठरले आहेत. भाजपची पोटदुखी अशी की शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा प्लॅन होता. लोक बॅगा भरुन तयारच होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था पूर्ण झाल्याचेही बोलले जात होते. मात्र पवारांच्या खेळीने भाजपचा प्लॅन कचऱ्याच्या टोपलीत गेला.

केरला स्टोरीवर भुजबळ म्हणाले….

दरम्यान सध्या कर्नाटकातील निवडणुकांचा प्रचाराचा शेवट दिवस असल्याने सर्वच राष्ट्रीय नेते मैदानावर आहेत. तसेच कर्नाटक निवडणुकीत बजरंग दलावर बंदी घालण्यात आली. यावर भुजबळ म्हणाले कि, धार्मिक आणि विषारी प्रचार जर कोणी करत असतील, तर त्यांच्यावर यापूर्वी बंदी घालण्याची मागणी झाली आहे. पण आता कोणी किती विषारी प्रचार करत आहे, हे मला माहीत नाही. चित्रपट केरळ स्टोरीवर ते म्हणाले कि, त्या चित्रपटात चुकीचे दाखवण्यात आले आहे, पण मला फारशी माहिती नाही. पण समाजात आणि धर्माधर्मात निर्माण होईल, अशा गोष्टी टाळण्यात याव्यात असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here