स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

0

रत्नागिरी : राज्य शासनाचे पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन येत्या २१ ते २८ मे २०२३ दरम्यान केले आहे.

या अंतर्गत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐतिहासिक पतितपावन मंदिरात केले आहे. स्पर्धा खुल्या गटासाठी होणार आहे.

स्वा. सावरकर यांच्या जीवन प्रसंगावर रांगोळी काढायची आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपयांची, उत्तेजनार्थ प्रत्येकी एक हजाराची दोन बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. २२ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धेला सुरवात होईल.

परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. रांगोळी काढण्यासाठी लागणारा वेळ, रांगोळीसाठी जागा स्पर्धेवेळी सांगण्यात येईल. स्पर्धकांनी आपली नावे देण्याची अंतिम तारीख १८ मेपर्यंत राहिल. स्पर्धकांनी आपली नावे संपर्क कमिटीकडे वेळेत द्यावीत. बक्षीस वितरण समारंभ २८ मे रोजी सकाळी ११ वाजता पतितपावन मंदिरात होईल.

अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी सौ. अनघा निकम – मगदूम (९४२२३७१९०७) आणि मंगेश मोभारकर (८७६६४३२८६४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 08-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here