रत्नागिरी आरटीओ कार्यालयात मोफत वायफाय

0

रत्नागिरी : ऑनलाईन सुविधा देताना नागरिकांना येणाऱ्या नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ मे पासून ही सुविधा रत्नागिरी आरटीओ कार्यालयात सुरू करण्यात आली आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या वाहनधारकांचे काम जलद गतीने होत आहे. राज्याचा परिवहन विभागही दिवसेंदिवस हायटेक होत आहे. या विभागाच्या सुमारे ५८ सेवा सारथी प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसेही बचत होत असून कार्यालयात मारावे लागणारे हेलपाटे वाचत आहे. नागरिकांना घरबसल्या आता सेवा मिळणार आहे. त्यामुळे रत्नागिरी आरटीओ विभागाचे काम आता अधिक गतिमान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here