अवकाळी पावसामुळे आंब्याचे उत्पादन घटले

0

रत्नागिरी : कोकणात आज आणि उद्या अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने त्याच अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून ढगा हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून कोकण किनारपट्टी वरती सुद्धा ढगाळ हवामान आहे.

सध्या दुपारपर्यंत आकाशात काळे ढग दाटून आलेले पाहायला मिळाले. सध्या मळभ असल्याने हवेतील आद्रता देखील वाढली आहे. पावसाची शक्यता वर्तवल्याने अंबा बागायतदार मात्र हवालदिल झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातील तरी आंबा मिळावा यासाठी आंबा बागायतदारांची धडपड पाहायला मिळते.

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जात असते. मात्र नंदुरबार जिल्ह्यात स्वतंत्र कांदा विक्रीसाठी बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत असते. त्यामुळे आता बाजार समितीने निर्णय घेतला आहे. कांदा विक्रीसाठी नवीन बाजारपेठ तयार करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फक्त कांद्याच्या लिलाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य मार्केट नसल्यामुळे अनेक शेतकरी बाहेरगावी जाऊन कांदा विक्री करत होते. त्यामुळे त्यांना परवडत नव्हतं, मात्र आता नंदुरबार जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना आपल्या मालाला योग्य भाव मिळणार असल्याने दोन पैसे शेतकऱ्यांचे वाचणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here