WTC Final साठी राहुलच्या जागी ईशान किशनला संधी, BCCI ची घोषणा

0

मुंबई : दुखातपतीमुळे केएल राहुल वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयने आज याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

केएल राहुलच्या जागी ईशान किशन याला संधी दिली आहे. आरसीबीविरोधातील सामन्यादरम्यान केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर तो उर्वरित आयपीएल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपला मुकला आहे. बीसीसीआयने केएल राहुलच्या जागी ईशान किशन याची निवड केली आहे. ईशान किशन सलामीला चांगला पर्याय आहे.. मधल्या फळीत तसेच सलामीला ईशान प्रभावी कामगिरी करु शकेल.

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतिक्षित वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ‘द ओव्हल’ येथे खेळवण्यात येणार आहे. 7 जून, 2023 पासून सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे संघ ठरले, ठिकाण ठरलं आणि दिवसही ठरला, मग आता विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीवर नाव कोण कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here