रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरून (Mumbai-Goa Highway News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी. परशुराम घाटात दरड कोसळली आहे.
पहाटेपासून अनेक प्रवासी ताटकळत आहेत. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. माती रस्त्यावर आल्याने गाड्या घसरत आहेत. पहाटे पडलेल्या जोरदार पावसामुळे दरड माती खाली आली आहे.
वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून वाहतूक खोळबंली आहे. पर्यायी मार्गाने लोटे-चिरणी-कळंबस्ते – चिपळूण मार्गाने वाहतूक वळविण्यात आली आहे.
सध्या राज्यात बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात बदल झाले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 09-05-2023
