रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा येथील समिना जेटी येथे किरकोळ कारणातून तांडेलाने थेट बोट मालकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. शनिवार 6 मे रोजी सायंकाळी 4.30 वा.सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी शरणप्पा हंचालप्पा होसेगिरी (35, रा. निट्टाली येलबुर्गा जि.कोप्पल,कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तांडेलाचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शनिवार 6 मे रोजी फिर्यादी हे आपल्या दुर्गा प्रसाद बोट नं (आयएनडी- एमएच-04- एमएम-4544) हिच्या नालीला डिंगणीतून कलर करण्याचे काम करत होते. बाजुला असलेल्या भराडी प्रसाद बोट नं (आयएनडी- एमएच-04- एमएम-3723) या बोटीचा त्यांना त्रास होत होता. त्यांनी त्या बोटीची पांग सैल करुन बोट मागे हटवली होती. ही बाब शरणप्पा होसेगिरीला समजताच त्याला राग आला. या रागाच्या भरात त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत आपल्या बोटीवरी लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारहाण करुन दुखापत केली.
याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शरणप्पा विरोधात भादंवि कायदा कलम 324,504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 09-05-2023
