सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रीय सुळे तुर्तास कोणतीही नवी जबाबदारी स्वीकारणार नसल्याचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ते पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी कारखान्यातील बायो सीएनजी प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारून निवृत्तीची घोषणा मागे घेतल्यानंतर शरद पवार पंढरपुरात पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊ नये यासाठी भाजपच्या अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले होते. कुणीही तर्कवितर्क लावले तरी सुप्रिया सुळे कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारणार नाहीत.खा. पवार हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील बायो सीएनजी प्रकल्प भूमिपूजन आणि शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. आता पुन्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी महाविकास आघाडी म्हणून कामाला लागणार असल्याचे पवारांनी जाहीर केले. राज्यातील १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोर्टाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. तो निर्णय काय असेल हे मी सांगू शकत नाही, मात्र तो निर्णय फडणवीस यांना माहिती असावा. त्यामुळेच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणत असावेत, अशी टिप्पणी पवारांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 09-05-2023