अहमदनगर : मनुष्यासह जैवविविधतेस धोकादायक असलेल्या प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प विरोधात शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली.
रिफायनरी प्रकल्प रद्द करावे व बारसू परिसराच्या जनतेवरील दडपशाही थांबविण्याची मागणी करुन प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प विरोधी समितीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनात भाकपचे राज्य सचिव कॉ.सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ.अॅड.बन्सी सातपुते, सहसचिव कॉ.अॅड. सुधीर टोकेकर, फिरोज शेख, अब्दुल शेख, सतिश पवार, अरूण थिटे, विनोद वारे, कन्हैय्या बुंदेले, विजय भोसले, प्रा.गणेश विधाते आदी सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 09-05-2023
