मुंबई : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. भाजपचा आलेला आदेश एकनाथ शिंदे यांना मान्य करावा लागतो, असं शरद पवार म्हणाले.
सामनावर भाष्य
अध्यक्षपदाचा राजीनामा आणि पक्षातील घडामोडी हा आमच्या घरचा प्रश्न आहे. 1999 साली सत्तेत गेले तेव्हा आम्ही अनके सहकाऱ्यांना कॅबिनेट मंत्री केलं आहे . आम्ही काय केलं त्यांना माहित नाही. महाविकास आघाडी वर काही परिणाम होणार नाही. आमच्यात काही गैरसमज नाही. आम्ही कुणाला संधी दिली, ते जाहीर करत नाही, असं शरद पवार म्हणालेत.
महाविकास आघाडीचे जागावाटपांबद्दल अद्याप चर्चा झालेली नाही. परंतु जेव्हा मी मुंबईमध्ये जाईल उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करेन. एक विश्वासदर्शक चित्र निर्माण करण्यात आमचा प्रयत्न असेल, असं शरद पवारांनी म्हटलंय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:01 09-05-2023
