पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना राजधानी इस्लामाबादमध्ये अटक करण्यात आली आहे.
इम्रान खानचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे वकील फैसल चौधरी यांनी माजी पंतप्रधानांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पाकिस्तान रेंजर्सनी इम्रान खानला इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेरून अटक केली. इम्रानला ‘अल्कादिर ट्रस्ट प्रकरणात’ अटक करण्यात आली आहे. पीटीआयचे नेते इम्रान यांना अटक केल्यानंतर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. इम्रान यांच्या अटकेनंतर पीटीआयने निषेध व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 09-05-2023
