खेड : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य रत्नागिरी जिल्हा संघटक म्हणून येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन शिर्के यांची निवड करण्यात आली आहे.
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन समाजकल्याण आयुक्तालय अंतर्गत काम करणारी संस्था आहे. व्यसनापासून समाजातील प्रत्येक घटकाने दूर राहून आपले हित करावे, याबाबत सामाजिक जागृती करण्याचे काम ही संस्था करते. समाज व्यसनमुक्त करण्याचे आपले ध्येय राहील, असे सचिन शिर्के यांनी सांगितले. शिर्के यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 09-05-2023