चिपळुणात १३ रोजी जल परिषद

0

चिपळूण : हेल्प फाऊंडेशन चिपळूणच्या वतीने शनिवार दि. १३ मे रोजी जल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या जलपरिषदेला सिंचन तज्ज्ञ दि. म. मोरे, अॅड. असीम सरोदे, आर्किटेक्ट यादवाडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. येथील डीबीजे कॉलेजच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी १० वाजता ही जलपरिषद होणार आहे. या परिषदेला आ. शेखर निकम, माजी आ. सदानंद चव्हाण, प्रांताधिकारी प्रविण पवार, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

चिपळूण शहराच्या भविष्यातील नियोजनबाबत महत्त्वाच्या ठरणाऱ्या या जलपरिषदेला नागरिकांनी व अभ्यासकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन हेल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश कदम आणि सहयोगी आशिष जोगळेकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 09-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here