पुणे : विजांच्या कडकडाटात पडणाऱ्या पावसाचा जोर आता कमी होणार आहे. शहर व परिसरात बरसल्यानंतर पावसाची स्थिती आता निवळण्याची चिन्हे असून पुढील आठवडाभर पुणे व परिसरात निरभ्र वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
त्यामुळे तापमानात वाढ होत उन्हाचे चटके नागरिकांना अनुभवावे लागणार आहेत.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरणासह पावसाची स्थिती पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाच्या स्थितीमुळे शहरातील कमाल तापमानातही सरासरीपेक्षा घट नोंदली जात होती. शहरासह उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाडा व उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. शहरात ९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:40 09-05-2023
