चिमुकली मायरा आता हिंदी मालिकेत झळकणार!

0

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

वयाच्या चौथ्या वर्षी मायरा ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली. अल्पावधीतच मायरा वैकुळ खूपच लोकप्रिय झाली. मायराच्या लोकप्रियतेची हिंदी मनोरंजनसृष्टीलादेखील भुरळ पडली आहे. चिमुकली मायरा आता हिंदी मालिकेत झळकणार आहे.

‘नीरजा एक नई पहचान’ या मालिकेच्या माध्यमातून मायरा हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहे. मायराच्या ‘नीरजा एक नई पहचान’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.

‘नीरजा एक नई पहचान’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये मायरा खूपच निरागस दिसत आहे. बालकलाकार मायराने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

चिमुकली मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:59 09-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here