रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सध्या सुरू असून ते रखडल्याने पाली बाजारपेठेतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
पाली बाजारपेठेत मुख्य वाहतुकीसाठी पूल उभारण्यात येणार आहे.
त्यामुळे स्थानिक वाहतुकीसाठी सेवा रस्ता बांधला जाणार असून त्याचे काम चालू झाले आहे. पण पावसाळा तोंडावर आला तरी ते काम अपूर्ण आहे. त्यामुळे सध्या व्यापारी, घरांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून त्या रस्त्यावरून दुचाकी गाडी चालवावी लागत आहे. पूर्ण रस्ता चिखलमय आणि धुळीने माखलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या आणि पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा त्रास दुकानामध्ये येणारे ग्राहक, स्थानिक लोक, रस्त्याशेजारी असणाऱ्या घरातील लोकांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे.
महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने लवकरात लवकर सेवा रस्त्याचे डांबरीकरण आणि गटाराचे काम करून द्यावे, अशी मागणी स्थानिक बाजारपेठेमधील रहिवासी आणि दुकानदार करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 10-05-2023
