नवी दिल्ली : देशातील वातावरणात सातत्यानं बदल (Climete change) होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain ) पडत आहे. सध्या देशात अनेक भागात अवकाळी पाऊस पडत आहे.
अशातच येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण आठवड्यात देशातील बहुतांश राज्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील. तसेच 13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
13 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळं तापमानात घट होणार नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात 5 ते 7अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 10-05-2023
