दापोली : दापोली उपविभागीय अधिकारी (प्रांत) पदाचा कार्यभार डॉ. अजित थोरबोले यांनी अधिकृतरित्या सोमवारी स्वीकारला. त्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाची वर्णी लागणार याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
दापोली उपविभागीय अधिकारी (प्रांत) पदाचा कार्यभार स्विकारलेले डॉ. अजित थोरबोले हे एमपीएससी 2014 च्या बॅचचे सनदी अधिकारी असून त्यांनी बीएमएस (मुंबई) ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी मिळविली आहे. ते सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील रहिवासी असून त्यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार येथे प्रांत अधिकारी, नंदुरबारचे उप जिल्हाधिकारी, जळगाव जिल्ह्यातील फैजापूर येथे प्रांत अधिकारी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडचे प्रांत म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे.
प्रशासनातील दांडगा अनुभव त्याच्या गाठीशी आहे. डॉ. अजित थोरबोले यांची आता दापोलीचे प्रांत म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. महसूल प्रशासनातील यशस्वी अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. ते दापोली-मंडणगड तालुक्यांना आपल्या प्रदिर्घ अनुभवाचा लाभ मिळून न्याय देतील, असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:09 10-05-2023