स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

0

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त राज्य पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन येत्या २१ ते २८ मे २०२३ दरम्यान केले आहे.

त्याचाच भाग म्हणून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धचे आयोजन केले आहे.

स्पर्धा बुधवारस २४ मे रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात होणार आहे. गट क्र. १ शालेय गट आठवी ते दहावीसाठी आहे. या गटासाठी क्रांतिकारक – स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वा. सावरकरांचे बालपण, सावरकरांचे चरित्र हे विषय दिले आहेत. याकरिता कालावधी ५ १ = ६ मिनिटे आहेत. यातील विजेत्यांना अनुक्रमे १५००, १००० आणि ५०० रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाईल. उत्तेजनार्थ प्रत्येकी २५० रुपयांची दोन बक्षिसे, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. गट क्र. २ खुला गट असून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि इतर सर्व व्यक्तींसाठी आहे. या गटासाठी सावरकर आणि आजचा भारत, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक सुधारणा आणि स्वा. सावरकरांचे हिंदुत्व हे विषय दिले आहेत. याकरिता कालावधी ६ १ = ७ मिनिटे आहे. विजेत्यांना २०००, १५०० आणि १०००, तसेच उत्तेजनार्थ प्रत्येकी २५० रुपयांची दोन बक्षिसे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धकांनी आपली नावे २० मे २०२३ पर्यंत द्यावीत. बक्षीस वितरण समारंभ २८ मे रोजी सकाळी ११ वाजता पतितपावन मंदिरात होईल. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी गजानन करमरकर (९४२२०१०९३०), भरत इदाते (९७६४२३०३४३), सौरभ आठल्ये (९७३००२०१०७) यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here