Breaking: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्याच?, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे संकेत

0

नवी दिल्ली : सत्तासंघर्षाच्या निकालाचा काऊंटडाऊन सुरू झाला झालाय. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. हा निकाल उद्या येणार आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान निकालासंदर्भात टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाच्या निकाल लागण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित

20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत घडामोडी घडल्या. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 14 फेब्रुवारी ते 16 मार्च सलग सुनावणी झाली. आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे. त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा.. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण आपल्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे.

राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना

गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे वकिलांसोबत तातडीनं दिल्लीला रवाना झाले आहेत. शेवाळे थोड्याच वेळात दिल्लीत होणार दाखल होणार आहे. सत्तासंघर्षांच्या सुनावणीची उत्सुकता वाढली आहे.

राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा

सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा (Supreme Court Result) आणि राजकीय घडामोडींचा संबंध नसतो. पण सध्या कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहेत. आज मतदान झाले 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासारख्या महत्वाच्या राज्याच्या राजकारणाचा निकाल संपूर्ण देशावर परिणाम करणारा असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:25 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here