रत्नागिरी : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू

0

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ, अपंग आणि आर्थिक मागास प्रवर्ग या शालेय विभागातील विद्यार्थिनींना आगामी शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहात विद्यार्थिनींना गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाणार असून त्यांची वसतिगृहात भोजन व निवास व्यवस्था मोफत केली जाईल. तसेच शालेय पुस्तके, स्टेशनरी व शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाणार आहे. तेल साबण व इतर खर्चासाठी म्हणून दरमहा ६०० रुपये निर्वाहभत्ता, छत्री, रेनकोट, गमबूटांकरिता ५०० रुपये आणि गणवेषाकरिता १००० रुपये त्यांच्या बचत खात्यात जमा केले जातील. वसतिगृहात सोलर वॉटर हिटर, रंगीत दूरदर्शन, संगणक यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. प्रवेशपात्र विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अनु. जाती/जमाती विद्यार्थीनींकरिता २५ हजार, विजाभज, विशेष मागासप्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग विद्यार्थीनींकरिता एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी गृहपालांकडे 9422053802/7507445125 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. वसतिगृहाचा पत्ता असा – नवीन १०० मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, प्रतीक भालचंद्र भोगले यांची इमारत क्र. २४३३, अलाहाबाद बँकेच्या मागे, टीआरपी, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 10-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here