मुंबई : अखेर राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकालाचा तो दिवस उजाडणार आहे. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी उद्याची सकाळ खूप गर्दीची असल्याचे म्हटले आहे. आजचा समलिंगी विवाह प्रकरणातील युक्तिवाद थांबविताना चंद्रचूड यांनी उद्या दोन निकाल द्यायचे आहेत, त्यामुळे पुढील सुनावणी ही उद्या दुपारी १२ नंतर होईल असे सांगितले आहे.
राहुल शेवाळे दिल्लीला निघाले आहेत.
दरम्यान, अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या सत्तासंघर्षावर काय होईल याची गेल्या १० महिन्यांपासून उत्सुकता लागून राहिली आहे. डॉ.अभिषेक मनु सिंघवी यांना चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आणि हे दोन निकाल कोणते याची चर्चा सुरु झाली होती. उद्या आम्ही दोन खंडपीठांचे निकाल सांगणार आहोत, असे ते म्हणाले.
पहिला निकाल हा राज्यातील सत्तासंघर्षाचा असेल तर दुसरा निकाल हा दिल्ली सरकार विरुद्ध एलजी प्रकरणाचा असणार आहे. 18 जानेवारी रोजी घटनापीठाने हा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, राज्यात घडामोडींना सुरुवात झाली असून उद्याच्या निकालाची कुणकूण लागताच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सोबत वकील देखील असल्याने निकाल काय लागणार यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत.
दरम्यान, आज युवासेनेचे आदित्य ठाकरे देखील ठाकरे गटाच्या नेत्यांसोबत राजभवनावर दाखल झाले होते. ते सत्तासंघर्षासाठी नाही तर रस्ता कंत्राटात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने राज्यपालांची भेट घेतली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 10-05-2023