सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

0

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना सगळीकडून खलबते सुरु आहेत.

अशातच या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा अशा शब्दांत त्यांनी सत्तासंघर्षावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षाच्या खटल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आली होती. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल आता गुरुवारी 11 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकारांना सामोरे गेल्यानंतर सत्तासंघर्षावर प्रश्न विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…मी तुम्हाला हात जोडतो, सर्वांना शुभेच्छा असे ते म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र एकच वाक्यात आपली प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले आहे. त्यामुळे आजच्या निकालाबाबत अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here