रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणांहून बेपत्ता झालेल्या व्यक्तींविषयी कोणाला माहिती मिळाली असल्यास ती कळविण्याचे आवाहन जिल्हा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
महेश कृष्णा हंबीर (वय ३८, कळंबणी बुद्रुक, ता. खेड) २९ सप्टेंबर २०२२ पासून बेपत्ता आहे. त्यांची उंची पाच फूट ८ इंच, रंग सावळा, अंगाने मजबूत, अंगामध्ये लाल रंगाचा टीशर्ट असून मरून रंगाची फुल पॅन्ट आहे. मिशी मध्यम राखलेली आहे. केस वाढलेले असून पायात चप्पल आहे. सोबत मोबाइल हँडसेट असून जीओ कंपनीचा सीमकार्ड नंबर 8779063224 असा आहे. या व्यक्तीविषयी माहिती मिळाल्यास खेड पोलीस ठाण्याला कळवावे.
शहनाज मुबारक फणसोपकर (वय २४, घर नं. २१२, जुना फणसोप, ता. जि. रत्नागिरी) ही व्यक्ती ११ ऑक्टोबर २०२२ पासून बेपत्ता आहे. तिची उंची पाच फूट २ इंच, नाक सरळ, पिवळ्या रंगाचा टॉप, निळ्या रंगाची सलवार, लाल रंगाचा स्टोल, काळ्या रंगाचा बुरखा, अंगाने सडपातळ, रंग गोरा, केस लांब, कानात सोन्याचे चेनसह झुमके, पायात साधी चप्पल, दोन्ही हातात हिरव्या बांगड्या, दोन सोन्याच्या बांगड्या, उजव्या व डाव्या हातात दोन सोन्याच्या अंगठ्या, शिक्षण नाही. ही व्यक्ती आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याला द्यावी.
यशवंत लक्ष्मण देवळे (वय ५५ वर्षे, रा. अडूर भाटलेवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) हे १६ डिसेंबर २००७ पासून बेपत्ता आहेत. त्यांची उंची पाच फूट पाच इंच, रंग काळा सावळा, चेहरा गोल, नाक बारके, डोळे काळे, केस पिकलेले, खाकी हाफ पँट, अंगात सफेद रंगाचा हाफ शर्ट, दारू पिण्याची आणि तंबाखू खाण्याची सवय आहे. ही व्यक्ती कोठे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ गुहागर पोलीस ठाण्याला द्यावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 11-05-2023
