मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ पासून याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
यावर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे.
देशातील अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. सरकार आणि विरोधक दोघांची धाकधूक वाढली असून, निकाल आमच्याच बाजूने येईल, असा दावा दोन्ही बाजूने केला जात आहे. तसेच ठाकरे गट असो की शिंदे गट दोन्ही गटाकडून आमचा न्यायालयावर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय योग्य तो निर्णय देतील, अशा प्रतिक्रिया देण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टोला लगावला आहे.
आमचा न्यायालयावर विश्वास आहे…हे काल म्हटलेलं वाक्य संध्याकाळपर्यंत लक्षात ठेवा नाहीतर पुन्हा पलटी माराल. आणि हा विकला गेलाय तो विकला गेलाय चालू होईल, असं संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटलं आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 11-05-2023
