नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकारणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचं घटनापीठ राज्यातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचा निकाल देणार आहे. या निकालानंतर राज्यातील सत्ताकारण बदलणार आहे की काय? हे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी महत्वाची याचिका आहे. यासंदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु या आमदारासंदर्भात निर्णय आल्यानंतर ठाकरे गट नवीन याचिका दाखल करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवले तर त्यानंतर ठाकरे गटाकडून नवीन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवल्यावर आम्ही नवीन याचिका दाखल करणार आहोत. त्या याचिकेत 24 आमदारांनाही अपात्र ठरवण्याची मागणी करणार आहोत, असे परब यांनी सांगितले.
*दैनिक रत्नागिरी खबरदार*
*ISO 9001:2015 CERTIFIED*
*(RNI NO. MAHMAR/2013/57411)*
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
10:51 11-05-2023
