कोकण रेल्वे मार्गावर आजपासून पुणे-रत्नागिरी स्पेशल

0

रत्नागिरी : उन्हाळी सुट्टी हंगामामुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह उन्हाळी स्पेशल विक्रमी गर्दीने धावत आहेत . मध्य रेल्वेने जाहीर केलेली रत्नागिरी – पनवेल अनारक्षित साप्ताहिक स्पेशल आज ११ मे पासून धावणार आहे.

०११३१/०११३२ क्रमांकाची पुणे- रत्नागिरी अनारक्षित साप्ताहिक स्पेशल दर गुरुवारी धावेल . ११ , १८ , २५ मे रोजी धावणारी स्पेशल पुणे येथून रात्री ८.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२० वाजता रत्नागिरी येथे पोहचेल . परतीच्या प्रवासात दर शनिवारी १३ , २० , २७ मे रोजी धावणारी स्पेशल रत्नागिरी येथून दुपारी १ वाजता सुटून त्यादिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल . २२ डब्यांची स्पेशल लोणावळा , कल्याण , रोहा , माणगाव , वीर , खेड , चिपळूण , सावर्डे , आरवली , संगमेश्वर आदी स्थानकात थांबेल .

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here