सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया…

0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं आज जो निर्णय दिला, त्याबाबत आम्ही समाधानी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं.

जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरल्याचे फडणवीस म्हणाले. लोक चुकीच्या चर्चा करत होते. आम्ही पत्रकार परिषदेत सविस्तर याबाबतचे विश्लेषण करु असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला. त्या निर्णयानंतर फडणीवस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोर्टाच्या निर्णयावर आम्ही समाधानी असल्याचे फडणवीस म्हणाले. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत आम्ही सविस्तर बोलू असेही फडणवीस यावेळी म्हणाले. आज सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील सत्तासंघर्षाबाबत महत्वाची निरक्षणे नोंदवली आहेत. यामध्ये सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मात्र, सध्या तरी शिंदे-फडणवीस सरकार बचावले आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावण्यात आला आहे.

गोगावलेंची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती बेकायदेशीर : सर्वोच्च न्यायालय

राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये न्यायालयानं कोर्टावर ताशेरे ओढले आहेत. पण सध्या शिंदे-फडणवीस सरकार बचावलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. सध्या राज्यातील सरकार वाचलं आहे. अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय लवकर घ्यावा असेही न्यायालयानं म्हटलं आहे. गोगावलेंची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती न्यायालयानं बेकादेशीर ठरवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले की, कोर्टानं दिलेला निर्णय मला मान्य आहे. आम्ही काळजी करत नसल्याचे ते म्हणाले.

ठाकरे गटाचे व्हिप पाळणे गरजेचे होते

दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्षाचा व्हिप अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाचे व्हिप महत्त्वाचे होते. ठाकरे गटाचे व्हिप पाळणे गरजेचे होते. गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे. विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वताला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे. 2019 साली सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडले होते. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:42 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here