खेड : तालुक्यातील मौजे भिलारे आयनी खोंडेवाडी येथील झगडआंबा येथे आंबे पाडण्यासाठी फांदी जोरजोरात हलवताना तोल जावून पडल्याने दगडावर आदळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 9 मे रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली. जितेश बाळाराम जाबरे (28, भिलारे, आयणी, खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेश जाबरे हा झगडआंबा येथे आंबे काढण्यासाठी गेला. तेथील आंब्याच्या झाडाची फांदी जोरजोरात हलवताना तोल जावुन खाली जमिनीवरील दगडावर पडल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित पेले. याबाबत खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 11-05-2023