नवीन व्हिप नियुक्तीची प्रक्रिया आजपासून सुरू; भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर ठरवल्यानंतर राहुल शेवाळेंची माहिती

0

मुंबई : व्हिप म्हणून कुणाला नियुक्त करायचं हे राजकीय पक्ष ठरवेल, त्या प्रमाणे आजपासून आम्ही नवीन व्हिपची नियुक्ती प्रक्रिया सुरू करू असं शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय.

भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती ही चुकीची असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून नवा प्रतोद नियुक्त करणयासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. नवा प्रतोद निवडण्याची प्रक्रिया ही आजपासूनच सुरू करण्यात येईल असं शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. व्हिप म्हणून नियुक्ती करताना ज्या काही चुका राहिल्या त्या सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिल्या असं ते म्हणाले.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार हे घटनेनुसार तयार झालेले सरकार आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगिंतलं आहे. भरत गोगावले यांची नियुक्ती ही बेकायदेशीर नाही तर त्यामध्ये प्रक्रिया फॉलो करण्यात आली नाही असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे आता आम्ही नवीन प्रतोदाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करु.

व्हिप म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती बेकादेशीर ठरवल्यानंतर आता सुनिल प्रभू यांचा व्हिप लागू होतो, त्यामुळे त्या आधारेच 16 आमदारांना अपात्र करावं अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब यांनी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राहुल शेवाळे म्हणाले की, व्हिप नियुक्ती ही राजकीय पक्षाने केली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे आजपासूनच आम्ही नवीन व्हिपची प्रक्रिया सुरु करत आहोत. विधानसभा अध्यक्ष जो ठरवतील तोच व्हिप असेल.

गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर

शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्षाचा व्हिप अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाचे व्हिप महत्त्वाचे होते. ठाकरे गटाचे व्हिप पाठणे गरजेचे होते. गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे. विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वताला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे. 2019 साली सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडले होते. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाल नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here