गुहागर: दुभाजकावर कार आदळून अपघात

0

गुहागर : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटपन्हाळे येथील दगडोबा जवळील तयार करण्यात आलेल्या दुभाजकावर मारुती स्विफ्ट डिझायर कार आदळून अपघात झाला. या अपघाताची वाहनांमधील पाचही जण बचावल्याने अनर्थ टळला.

गुहागर पोलीस ठाण्यात या अपघाताबाबत वाहनाचे मालक विजय शांताराम दणदणे (रा. मुंबई गोरेगाव) यांनी फिर्याद केली आहे.. ते मंगळवारी रात्री 10 वाजता आपल्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार घेऊन गुहागर तालुक्यातील अडूर पड्याळवाडी येथील उत्सवासाठी येत होते. बुधवारी पहाटे साडेसहाच्या दरम्यान गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर श्रृंगारतळी पाटपन्हाळे येथील दगडोबा जवळील तयार करण्यात आलेल्या दुभाजकाजवळ समोर आलेल्या बैलाला वाचवण्याचा प्रयत्नात थेट दुभाजकावर जाऊन आदळली.

या महामार्गावर अतिशय चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या दुभाजकाचे टोक हे वाहनचालकांना घातक ठरले आहे व त्याच दुभाजकावर जाऊन ही कार आदळली. दुभाजकाचा रॉड थेट पाठच्या सीटपर्यंत घुसला असून सुदैवाने प्रवासी राजेश शांताराम दणदणे, विजया विजय दणदणे, प्रज्ञा विजय दणदणे, नाना रूपा हळये असे पाचही जण या अपघातापासून सुखरूप बचावले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:33 11-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here