पुणे : राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, १२ मेपासून कोकण व मध्य महाराष्ट्रात ती अधिक तीव्र होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला.
गुरुवारी राज्यात जळगाव शहराचा पारा ४४.८ अंशांवर, तर त्यापाठोपाठ पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा ४४.४ अंशावर गेल्याने अंगाची लाही लाही होत होती.
दरम्यान, बंगालच्या दक्षिण-पूर्व उपसागरात गुरुवारी मोखा हे चक्रीवादळ तयार झाले. त्याचा वेग ताशी ५० ते ६० कि. मी. असून, शुक्रवारी तो ८० ते ९५ वर जाणार आहे. भारतीय किनारपट्ट्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात गुरुवारी चक्रीवादळात रूपांतर झाले. आता ते बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पूर्व भागातून उत्तरेकडे जात असून, १४ मे रोजी ते बांगला देशातील कॉक्सबाजार व म्यानमार येथील कायापट्ट बंदरावर धडकणार आहे. १५ मे रोजी हे चक्रीवादळ शांत होईल.
मोचा नव्हे, मोखा… या वादळाचे मोचा नव्हे तर मोखा असे सुधारित नाव गुरुवारी हवामान विभागाने जाहीर केले. मोखा हे नाव येमेन देशाने दिले असून, तेथील एका बंदराचे नाव आहे. हे नाव झाडाचे असून ती एक आयुर्वेदिक वनस्पती आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 12-05-2023
