Maharashtra Political Crisis: न्यायालयाच्या निकालावर अजित पवारांची मिश्कील प्रतिक्रिया…

0

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर लागला असून शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde) वाचले आहे.

सगळं बेकायदेशीर मात्र सरकार कायदेशीर असं या निकालातून समोर आलं आहे. या निकालावर विरोधक टीका करत आहे. त्यातच मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दिल्लीला गेलो नाही एवढंच सांगा, अशी मिश्कील टिप्पणी नेहमीप्रमाणे आजित पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. विरोधकांनी सरकार पडणार असल्याचं वक्तव्य अनेकदा केलं होतं. 16 आमदार अपात्र ठरणार आणि शिंदे-फडणीस कोसळणार अशी टीका विरोधकांनी केली होती. त्यानंतर या सगळ्याचा आज निकाल जाहीर झाला. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हा निकाल वाचून दाखवला. यानुसार सुप्रीम कोर्टाने राज्यपालाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले, याचबरोबर भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर असल्याचे सांगितले आणि संपूर्ण निकालातून शिंदे फडणवीस सरकार वाचलं असल्याचं स्पष्ट होत आहे.

‘मी जोपर्यंत संपूर्ण निकाल वाचत नाही तोपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. साताऱ्यात मी जे बोललो होतो ते झालं एवढं मात्र नक्की, असं म्हणत अजित पवार माध्यमांसमोरुन निघाले आणि गाडीत जाऊन बसले. मात्र जाताना अजित पवार यांनी नेहमी प्रमाणे त्यांच्या स्टाईलमध्ये टिप्पणी केली आहे. मी फक्त दिल्लीला गेलो नव्हतो एवढं सांगा’, असं ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?
भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण. अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत, हा बचाव होऊ शकत नाही. सरकारवर शंका घेण्याचं कारण राज्यपालांकडे नव्हतं. बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here