महामार्गावरील १५ पैकी ६ ब्लॅकस्पॉट हटवले

0

रत्नागिरी : रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अजेंड्यावर असलेले धोकादायक १५ ब्लॅकस्पॉटपैकी ६ स्पॉट हटवण्यात यश आले आहे. वर्षभर हे ब्लॅकस्पॉट हटवणे संबंधित विभागाच्या संयुक्त कार्यवाहीमुळे हे शक्य झाले आहे. जिल्ह्यात आता फक्त ९ ब्लॅकस्पॉट राहिले आहेत. तेही हटवण्याच्यादृष्टीने यंत्रणा काम करत आहे.

आरटीओंनी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी केलेली जनजागृती आणि ब्लॅकस्पॉट हटवण्यासाठी सर्व विभागांनी घेतलेली मेहनत यामुळे वर्षभरातील फेटल (प्राणांकित अपघात) अपघातांमध्ये ४० टक्के घट झाली आहे.

रस्ता सुरक्षा समितीच्या माध्यमातून सर्व्हे करून ही कार्यवाही करण्यात आली आहे. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा म्हणून संबोधला जात होता. खेड तालुक्‍यातील कशेडी घाट ते सिंधुदुर्ग दरम्यानच्या सुमारे ४०० किलोमीटरच्या मार्गावरील सुमारे २०० किलोमीटर मार्गात अवघड वळणे आहेत. परजिल्ह्यातील चालकांना हा महामार्ग नवखा आणि अवघड वळणाचा वाटतो. शिवाय ७५ टक्के वाहनचालक या मार्गावरील नियम धाब्यावर बसवून वाहने हाकतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे मत रत्नागिरीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यापूर्वीच व्यक्त केले आहे. महामार्गावरील वाहतूक गेल्या काही वर्षांमध्ये चौपट वाढली आहे. या मार्गावरून दररोज दीड ते दोन हजारांपेक्षा अधिक वाहने ये-जा करतात. त्यात ३५ ते ४० टक्के अवजड वाहनांचा समावेश आहे. इतर जिल्ह्यांत सरळ रस्ते असल्याने वाहने वेगाने चालवण्यात अडचणी येत नाहीत.

चौपदरीकरणात वळणे हटवून रस्ते झाले सरळ
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भूसंपादनाचे काम ८० टक्के झाले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हवाई पाहणीनंतर कामाला गती आली आहे. काम वारंवार लांबल्यामुळे मूळ रस्त्यावरील १३ ब्लॅकस्पॉटमुळे वारंवार अपघात घडत होते. रस्ता सुरक्षा समितीने आणि विशेष म्हणजे आरटीओ जयंत चव्हाण, अजित ताम्हणकर, अविनाश मोराडे आदींच्या टीमने उत्तम काम केले. बांधकाम विभागाच्या मदतीने वळणे हटवून रस्ता सरळ करण्यात आला तर आरटीओंनी वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी चालकांमध्ये जनजागृती केली. अनेकांवर दंडात्मक कारवाई केली तर काहींना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीद्वारे समजावून सांगण्यात आले.

…हे आहेत महामार्गावर ब्लॅकस्पॉट
पागनाका (चिपळूण), कामथे (चिपळूण), कोंडमळा (सावर्डे), आगवे-सावर्डे (सावर्डे), आरवली (संगमेश्वर), तुरळ (संगमेश्वर), वांद्री (संगमेश्वर), निवळी गाव (रत्नागिरी), हातखंबा गाव (रत्नागिरी), कापडगाव (रत्नागिरी), पाली (रत्नागिरी), नाणिज, वेरळ घाटी (लांजा), लांजा बाजारपेठ , कुवे गाव (लांजा)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here