रत्नागिरी : पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमटीडीसी) पाठ्यवृत्ती जाहीर केली आहे. त्याकरिता १५ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पाठ्यवृत्तीसाठी प्रवेश परीक्षा होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा ४० हजार रुपयांचे विद्यावेतन दिले जाणार आहे.
यामध्ये नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळणार आहे. या पाठ्यवृत्तीसाठी २१ ते २६ वर्षे पूर्ण झालेल्या युवक-युवतींना अर्ज करता येणार आहे. कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. तसेच पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाव्यवस्थापक, मफतलाल हाऊस, एस. टी. पारीख मार्ग, १६९ बॅकबे रिक्लेमेशन्स, चर्चगेट, मुंबई या पत्त्यावर अर्ज करावा लागणार आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची २५ मे रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर होऊन मुलाखती पार पडतील. त्यानंतर निवड झालेले उमेदवार रूजू करून घेतले जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 12-05-2023
