अलोरे येथील यांत्रिकी विभागाच्या कार्यालयावर झाड कोसळून नुकसान

0

चिपळूण : अलोरे येथील यांत्रिकी विभागाच्या कार्यालयावर झाड कोसळून नुकसान झाले. सुदैवाने कार्यालयात कर्मचारी या विभागात नसल्याने अनर्थ टळला.

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यालय अलोरे येथे आहे. तेथील कार्यालयावर झाड कोसळले. त्यात कोणीही जखमी झाले नसले, तरी विभागातील संगणकासह इतर साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले.दरम्यान, या कार्यालयाकडून पत्रे दुरुस्तीच्या कामाबाबत दिरंगाई केली जात असून कार्यालय परिसरात वाढलेली झाडे तोडण्यासाठीही विलंब होत आहे. मात्र या प्रकारानंतर तरी दुरुस्तीच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:39 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here