विविध कार्यकारी संस्थांच्या संचालकांना दापोलीत मार्गदर्शन

0

रत्नागिरी : वाशी (नवी मुंबई) येथील शिखर प्रशिक्षण व संशोधन संस्था, महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि. आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने दापोली तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या संचालकांसाठी सुशासन व व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दापोली अर्बन बँक सायन्स महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बाळासाहेब देशमुख यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ग्रामीण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची कार्ये, शेतकऱ्यांना देण्यात येणारे कमी व्याजदराचे कर्ज, कोणकोणत्या योजना राबवून शेतकऱ्यांना उभे केले जाऊ शकते, याची माहिती दिली. शासनाच्या सुमारे ४०० योजना संस्थेमार्फत राबवून त्याचे फायदे शेतकऱ्यांना कसे देता येतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पैशाची तसेच वेळेची बचत होऊन त्याच फायदा कसा होईल, याची माहिती देण्यात आली.

परसबागेतील भाजीपाला, कुक्कुटपालन, शेळीपालन गाई-म्हशीपालनाचे फायदे व त्यासाठी मिळणारे कर्ज व अनुदान यासाठी राज्य बँक व जिल्हा बँक यांच्याकडून कशा पद्धतीने कर्ज व्यवहार करावा, याचीही माहिती देण्यात आली. शेती व फळझाडांबर फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन यंत्रापासून होणारे अनेक फायदे व तोटे याची माहिती व प्रात्यक्षिकासह देण्यात आली.
यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक जयवंत जालगावकर, सुधीर कालेकर यांनीही मार्गदर्शन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:53 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here