रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि अकोला येथील महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्स्टेन्शन एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक शेती या विषयावर राष्ट्रीय परिसंवाद झाला.
याप्रसंगी कृषी क्षेत्रामध्ये गेली ३५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी करून फळपिके आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या योगदानाबद्दल कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
परिसंवादाच्या उद्घाटनाला डॉ. संजय सावंत, महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्स्टेन्शन एज्युकेशनचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत कलंत्री, डॉ. के. सामी रेड्डी, डॉ. महेंद्र ढवळे, डॉ. अशोक निर्बाण, डॉ. जी. के. सावंत, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत, अधिष्ठाता डॉ. बी. जी. देसाई आदी उपस्थित होते. या परिसंवादामध्ये कोकणात गेली ३५ वर्षे विस्तार शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दलचा सन २०२२-२३ चा (कै.) यमुनाबाई कृष्णराव सावंत मेमोरियल ॲवॉर्ड विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांना देण्यात आला.भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सांगता समारंभामध्ये संशोधनाचे सादरीकरण केलेल्या शास्त्रज्ञांना उत्कृष्ट संशोधनपर सादरीकरणाबद्दल स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:43 12-05-2023