आ. योगेश कदम यांची शिवसेना शिंदे गट प्रवक्तेपदी निवड

0

रत्नागिरी : दापोलीचे आमदार योगेश कदम यांची शिवसेना शिंदे गट प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे.

कदम एक तरुण नेतृत्व असून त्यांनी आपल्या मतदारसंघातील विविध समस्या अनेकवेळा विधिमंडळात मांडल्या आहेत.

आपल्या आक्रमक वक्तृत्व शैलीमुळे ते जनमानसात लोकप्रिय असून त्यांनी युवा कार्यकर्त्यांवर आपली छाप पाडली आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन ते राजकारणात प्रवास करीत आहेत. विविध सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू त्यांनी समर्थपणे जनतेसमोर मांडतानाच मतदारसंघातील विकासकामाबाबतही त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांची प्रवक्तेपदी नेमणूक केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा युवा पिढीला होणार आहे.

दापोली शिवसेनेतर्फे आमदार संपर्क कार्यालयात तालुकाप्रमुख उन्मेष राजे, उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, प्रदीप सुर्वे, माजी सभापती ममता शिंदे, आदींसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कदम यांचे अभिनंदन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:49 12-05-2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here