रत्नागिरी जिल्हय़ाची आर्थिक कणा असलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन आकर्षक भव्य वास्तू उभी राहिली असून या वास्तूचा शुभारंभ माजी कृषीमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार आहे.
या भव्य दिव्य वास्तूचे काम पूर्ण झाले असून सजावटीचे कामदेखील संपत आले आहे. ही सुंदर वास्तू रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणार आहे. बँकेचे अध्यक्ष डॉ तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष श्री बाबाजी जाधव यांच्या प्रेरणे मधून ही भव्य वास्तू उभी राहत आहे. बँकेच्या या शुभारंभ सोहळ्याला माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार,सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख,पर्यावरणमंत्री रामदासभाई कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, खासदार विनायक राऊत, खासदार सुनील तटकरे ,आमदार भास्कर जाधव ,राजन साळवी, सदानंद चव्हाण, संजय कदम, आमदार हुस्नबानू खलिपे, कॉपरेटिव्ह बँक एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, कार्याध्यक्ष सुनील साळवी यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यकारी संचालक जीवन गांगण यांनी केले आहे.
