रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी झालेल्या रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन कमलाकर तथा आबा पाटील हे रत्नागिरी जिल्हा इतर मागासवर्ग मतदारसंघातुन बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित रत्नागिरी या बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मागील दोन टर्म कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक असलेले गजानन कमलाकर पाटील यावेळी तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामाचा अनुभव, प्रशासनातील बारकावे आणि बाजार समितीच्या कामकाजाची पद्धत या बाबी परिपूर्ण माहीत असल्याने गजानन पाटील यांची निवड योग्य असल्याची प्रतिक्रिया येत आहेत.
त्यांच्या याच विजयाबद्दल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरी तालुक्यातील सर्व कर्मचारी वृंद यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरीचे संचालक रामचंद्र गराटे, संदीप तांबेकर,नरेंद्र जाधव, प्रदीप परीट, भालेकर साहेब, गंगावणे साहेब यांच्यासह बँक अधिकारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 13-05-2023